भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमनंदुरबार

अबब… तब्बल ४३ लाखाच्या लाचेची मागणी,सा. बा. विभागाचा कार्यकारी अभियंता जाळ्यात

मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। पूर्ण केलेल्या कामांच्या उर्वरित बिलाच्या व नवीन कार्यारंभ आदेश देण्याच्या मोबदल्यात एकूण रकमेच्या टक्केवारीच्या स्वरूपात तब्बल ४३ लाख रुपये एवढ्या लाचेच्या रकमेची मागणी कर करणाऱ्या महेश प्रतापराव पाटील, वय ५१ वर्ष, व्यवसाय – नोकरी कार्यकारी अभियंता (वर्ग – १), सार्वजनिक बांधकाम विभाग, शहादा जि. नंदुरबार. मूळ रा. फ्लॅट २०३, अष्टविनायक टाॅवर, थत्ते नगर, गंगापूर रोड, नाशिक.याना मागणी केलेल्या लाचेच्या रक्कमेपैकी ०३ लाख ५० हजार रुपये घेताना नंदुरबार एसीबी पथकाने सापळा रचूनरंगेहात पकडून अटक केली.

तक्रारदार हे खैरवे ता.शहादा, जि. नंदुरबार.येथील रहिवासी असून शासकीय नोंदणीकृत बांधकाम ठेकेदार आहेत यांनी मागील सहामहिने ते एक वर्षाच्या कालावधीत नंदुरबार जिल्ह्यात प्रमुख जिल्हा मार्ग, प्रमुख राज्य मार्ग अशा विविध रस्त्यांच्या नवीन डांबरीकरणाची व डागडुगीची कामे पूर्ण केली आहेत. तसेच सध्याच्या कालावधीत तक्रारदार यांच्या तीन नवीन कामांच्या निविदा मंजूर होऊन त्यांचे कार्यारंभ आदेश सार्वजनिक बांधकाम विभाग, धुळे या कार्यालयाकडून कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, शहादा या कार्यालयात आले आहेत. परंतु नमूद तिन्ही कामांचे कार्यारंभ आदेश आज रोजी पावतो तक्रारदार यांना मिळालेले नाहीत.


तक्रारदार यांनी पूर्ण केलेल्या कामांबाबतची ३ (तीन)कोटी ९२ लाख ७९ हजार २८५ रुपये एवढी बिलाची प्रलंबित रक्कम काढणे व याव्यतिरिक्त प्रस्तावित असलेल्या तीन कामांचे ५ कोटी ३३ लाख रुपये एवढ्या रकमेचे कार्यारंभ आदेश मिळणेकामी महेश प्रतापराव पाटील, कार्यकारी अभियंता वर्ग १, सार्वजनिक बांधकाम विभाग, शहादा, जिल्हा नंदुरबार यांच्याकडे तक्रारदार यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला व अनेक वेळा विनंती केली. परंतु त्यांनी बिलाची रक्कम मंजूर केली नाही. तसेच कार्यारंभ आदेश सुद्धा दिले नाहीत. यानंतर तक्रारदार यांनी महेश पाटील
यांना विनंती व पाठपुरावा केला असता तक्रारदर यांनी पूर्ण केलेल्या कामांची बिले काढण्यासाठी वेळोवेळी १०% व तीन्ही कार्यारंभ आदेश देण्यासाठी ०.७५% ते १ अशा टक्केवारीच्या स्वरूपात एकत्रित ४३ लाख रुपये एवढ्या लाचेच्या रकमेची मागणी केली.

मागणी केलेल्या लाचेच्या रक्कमेपैकी दिनांक ०२/०३/२०२३ रोजी ०३ लाख ५० हजार रुपये अशी रक्कम महेश पाटील यांना त्यांच्या शहादा येथील शासकीय निवासस्थानी तक्रारदार यांच्याकडून पंचांसमक्ष स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले आहे. सदर बाबत शहादा पोलीस स्टेशन जिल्हा नंदुरबार येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सापळा अधिकारी श्री राकेश आ. चौधरी, पोलिस उप अधीक्षक, ला.प्र.वि., नंदुरबार. पो.नि. समाधान एम. वाघ, पो.नि. माधवी एस. वाघ, पोहवा/विलास पाटील, विजय ठाकरे, पोना/देवराम गावित, अमोल मराठे, ज्योती पाटील, मनोज अहिरे,संदीप नावाडेकर व चापोना/जितेंद्र महाले सर्व नेम. ला.प्र.वि., नंदूरबार यांनी कारवाई केली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!