भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

राजकीयराष्ट्रीय

नरेंद्र मोदी आजच करणार सरकार स्थापनेचा दावा, एकनाथ शिंदे सह TDP आणि JDU ने दिलं समर्थन पत्र

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आजच करणार सरकार स्थापनेचा दावा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सह TDP आणि JDU ने दिलं समर्थन पत्र एनडीएची आज दिल्लीत बैठक सुरु आहे. या बैठकीत नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू भाजपला समर्थन देणारे पत्र दिले आहे अशी माहिती मिळत आहे. हे समर्थन असलेले पत्र राष्ट्रपतींना आज दिलं जाऊ शकतं. त्यानंतर आजच सत्तास्थापनेचा दावा केला जाऊ शकतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आजच सरकार स्थापनेचा दावा करणार आहे. एनडीएकडून आजच सरकार स्थापनेसाठी एनडीएमधील घटक पक्षांचं समर्थन पत्र दिलं जाणार आहे. राष्ट्रपतींकडून १७ वी लोकसभा विसर्जित करण्यात आली आहे. मंत्रिमंडळाच्या शिफारशीनुसार १७ वी लोकसभा विसर्जित करण्यात आल्याचे राष्ट्रपती भवनाने प्रसिद्धीपत्रक जारी केले. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल मंगळवारी जाहीर झाले आहेत. भाजप बहुमतापासून लांब राहिल्याने त्यांना आता इतर मित्रपक्षाच्या मदतीने सरकार स्थापन करावे लागणार आहे. गेल्या दोन वेळा सत्तेत असलेल्या भाजपला यावेळी पूर्ण बहुमत न मिळाल्याने त्यांना आता जेडीयू आणि टीडीपीची ,शिवसेना शिंदे गट यांची मदत घ्यावी लागणार आहे. भाजपला यंदा २४० जागा मिळाल्या आहेत. आज संध्याकाळी ७.३० वाजता सरकार स्थापनेचा दावा केला जाणार असल्याची माहिती आहे. ८ जूनला मोदींचा शपथविधी सोहला पार पडणार असल्याची माहिती आहे.पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानी आज  एनडीएची बैठक होत आहे. या बैठकीला गृहमंत्री अमित शहा यांच्यासह बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, टीडीपीचे प्रमुख चंद्राबाबू नायडी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित आहेत. नितीश कुमार हे निवडणुकीच्या आधीच इंडिया आघाडी सोडून एनडीएमध्ये सहभागी झाले होते. आता आम्ही एनडीएमध्येच राहू असे जेडीयूचे प्रवक्ते केसी त्यागी यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानी आज  एनडीएची बैठक होत आहे. या बैठकीला गृहमंत्री अमित शहा यांच्यासह बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, टीडीपीचे प्रमुख चंद्राबाबू नायडी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित आहेत. नितीश कुमार हे निवडणुकीच्या आधीच इंडिया आघाडी सोडून एनडीएमध्ये सहभागी झाले होते. आता आम्ही एनडीएमध्येच राहू असे जेडीयूचे प्रवक्ते केसी त्यागी यांनी म्हटले आहे. एनडीए सरकार स्थापन करण्यासाठी कोणताही वेळ न गमवता लगेचच सरकार स्थापनेचा दावा करणार आहे. कारण नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांना इंडिया आघाडीकडून ऑफर देण्यात आली आहे. गेल्या दोन निवडणुकांमध्ये दारुण पराभव झाल्यानंतर यंदाची निवडणूक विरोधकांसाठी संजीवनी ठरली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!