भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

नाशिक

राज्य पोलीस दलातील 14 पोलीस अधिकाऱ्यांना IPS केडर,लाच लुचपतच्या कडासने चा समावेश

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

नाशिक ,मंडे टू मंडे वृत्तसेवा। केंद्र सरकारने महाराष्ट्र पोलीस दलातील 14 पोलीस अधिकाऱ्यांना IPS केडर जाहीर केले आहे. त्यात नाशिकचे पोलीस उपायुक्त अमोल तांबे, संजय बारकुंड, लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांचा समावेश आहे.

यापूर्वी नाशिक मध्ये उपायुक्त म्हणून असलेले व सध्या मुंबईत असलेले संग्रामसिंह निशाणदार, डी. एस. स्वामी व श्रीकृष्ण कोकाटे यांचाही यात समावेश आहे.

2019 पासून संबंधित पोलीस अधिकाऱ्यांच्या बढतीची यादी प्रलंबित होती. ही यादी आज जाहीर केल्याने केंद्र सरकारने हे एकप्रकारे मकरसंक्रांतीचे गिफ्ट दिले आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या 14 जणांच्या यादीत सन 2019 चे 8 व सन 2020 च्या 6 अधिकाऱ्यांचा समावेश आहे. केंद्र सरकारने याबाबतचे अधिकृत आदेश पारीत केले आहेत.

14 जणांची यादी खालील प्रमाणे

सुनील कडासने
संजय बारकुंड
डी. एस. स्वामी
अमोल तांबे
संग्रामसिंह निशाणदार
श्रीमती स्मार्तन पाटील
श्रीकृष्ण कोकाटे
पी एम मोहीते
संजय लाटकर
सुनील भारद्वाज
एन ए अष्टेकर
मोहन दहिकर
विश्वा पानसरे
वसंत जाधव

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!