भरदिवसा गाडीतून १५ लाख रुपयांची रोकड लंपास
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
नाशिक (प्रतिनिधी)। येथील मुंबई नाका परिसरातील हॉटेल छान जवळ उभ्या असलेल्या गाडीची काच फोडून १५ लाख रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना घडली आहे. भरदिवसा ही घटना घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई नाका येथून इंदिरानगरकडे जाणाऱ्या सर्व्हिस रोडवर असलेल्या हॉटेल छानच्या पान टपरी जवळ दुपारी ३:३० वाजेच्या सुमारास सदरील व्यापारी हा थांबला होता त्याठिकाणी काही युवक दुचाकी गाडी वरुन आले आणि त्यांनी कुणाला काही कळण्याच्या आत गाडीची काच फोडून त्या ठिकाणी असलेली काळ्या रंगाची १५ लाख रुपयांची रोकड असलेली बॅग ही चोरून नेली, या घटनेबाबत तातडीने मुंबई नाका पोलिस स्टेशनला माहिती देण्यात आली, त्यानंतर या ठिकाणी पोलीस उपायुक्त अमोल तांबे, सहाय्यक पोलीस आयुक्त दीपाली खन्ना, मुंबई नाका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विजय ढमाळ या सह अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित झाले. ही या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.