भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमनाशिक

जुन्या कुरापती वरून मित्रानेच मित्राच्या गळ्यावर चॉपरने वार करून हत्या

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

नाशिक,मंडे टू मंडे वृत्तसेवा। दारू पित बसलेल्या मित्रांमध्ये जुन्या कुरापती वरून वाद झाले. त्यावरून मित्रानेच मित्राच्या गळ्यावर चॉपरने वार करून त्याची हत्या केली. हत्या करून घटनास्थळावरून पळून जात असताना पोलिसांनी दोन हल्लेखोरांना पाठलाग करून ताब्यात घेतले.

या बाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आज दुपारी अरिंगळे मळा, एकलहारा रोडवर रणजित उर्फ रिंकू हरभजन ग्राय (वय ३५) हा आपले मित्र सराईत गुन्हेगार ज्ञानेश्वर उर्फ नान्या नारायण उमाप (वय २१, रा. नेहे मळा, ओढा रोड), व शब्बीर मोहमद शेख (वय २५) हे तिघे दारू पिण्यासाठी बसले होते. दारू पीत असतांना या तिघांमध्ये जुन्या वादाची चर्चा उफाळून आली. तेव्हा रणजित उर्फ रिंकू याने शब्बीर याच्या कानाखाली टेकवली. याचा राग आल्याने सराईत गुन्हेगार ज्ञानेश्वर उर्फ नान्या याने आपल्या जवळील चॉपरने रिंकूच्या गळ्यावर वार केले तर शब्बीरने जवळील चाकूने मारले. त्या नंतर नान्याने रिंकूला उचलून खाली आपटले. परिसरात जोरदार आरडाओरडा झाला. काही नागरिकांनी या बाबत पोलिसांना कळवले. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, पोलीस निरीक्षक गणेश न्याहदे, राजू पाचोरकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश पाटील, उपनिरीक्षक गोसावी, गुन्हे शोध पथकाचे हवालदार अनिल शिंदे, जाधव, गोसावी यांनी घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांना पाहताच दोन्ही हल्लेखोर पळून जाऊ लागले, तेव्हा गुन्हे शोध पथकातील राकेश बोडके, कुंदन राठोड, गोपनीय शाखेचे सुजित जाधव, हेमंत मेढे यांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेत हल्ल्यात वापरलेले हत्यारे जप्त केली. रणजित उर्फ रिंकू यांच्या पश्चात वृद्ध आई, पत्नी, एक मुलगा, भाऊ असा परिवार आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!