कृषी केन्द्र अधिकाऱ्यास 5 हजार रूपयांची लाच घेताना अटक
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
नाशिक,मंडे टू मंडे वृत्तसेवा। कृषी केन्द्राच्या परवाना नुतनीकरणासाठी अडचण येऊ न देण्यासाठी 5 हजार रूपयांची लाच घेणाऱ्या तालुका कृषी अधिकाऱ्यास पकडण्यात आले.
याप्रकरणी मिळालेली अधिक माहिती अशी की, पेठ तालुक्यातील करंजाळी येथील कृषी केंद्राचे संचालकाच्या तक्रारीवरुन लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने आज हा छापा टाकला. तक्रारदार यांच्या केंद्रातील शेती उपयुक्त बी-बियाणे, रासायनिक खते व किटकनाशके यांचा स्टॉक योग्य असल्याचे दाखविणे तसेच या केन्द्राच्या परवाना नुतनीकरणासाठी अडचण न येऊ देण्यासाठी पेठचे तालुका कृषी अधिकारी अरविंद भाऊराव पगारे यांनी 5 हजार रुपये लाचेची मागणी केली. ही रक्कम करंजाळी येथील गुरुदत्त मोटर रीवाइंडिंग वर्क्स दुकानासमोर ही रक्कम स्वीकारतांना त्यांना पकडण्यात आले. ही कारवाई पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांच्या मार्गदर्शनाखाली लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली.