खुनाच्या गुन्ह्यात जेलमधून पॅरोलवर सुटलेल्या आरोपी कडून ब्यूटीपार्लर चालक महिलेवर बलात्कार
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
नाशिक,मंडे टू मंडे वृत्तसेवा। ब्यूटी पार्लर चालक महिलेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक नाशिकमध्ये समोर आल आहे. पार्लरमध्ये पूजा करत असताना दुकानात शिरुन आरोपीने महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. सराईत गुन्हेगाराने चाकूचा धाक दाखवून व्यावसायिक महिलेवर बलात्कार केला.
नेमकं काय घडलं?
नाशिकमध्ये पवननगर भागात एका व्यावसायिक महिलेवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. सराईत गुन्हेगाराने चाकूचा धाक दाखवून तिच्यावर अत्याचार केले. या भागात पीडित महिलेचं ब्यूटी पार्लर आहे. आपल्या पार्लरमध्ये पूजा करत असताना संशयित आरोपी दुकानात घुसला. त्यानंतर आतून दरवाजा लावून आरोपीने तिला चाकूचा धाक दाखवला. महिलेच्या तोंडात बोळा कोंबून, तिचे हात बांधून तिच्यावर जबरदस्ती केल्याचा आरोप आहे.
खुनाच्या गुन्ह्यात जेलमधून पॅरोलवर
हिंमत करुन महिलेने अंबड पोलिसात तक्रार दाखल केली. खुनाच्या गुन्ह्यात जेलमधून पॅरोलवर सुटल्यानंतर संशयित फरार झाला होता. त्याचा शोध सुरु असतानाच त्याने बलात्काराचा गुन्हा केला . फरार संशयिताचा शोध सुरु आहे.