भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

नाशिक

अग्नी तांडव; पहाटे प्रवासी गाढ झोपेत असतानाच काळाचा घाला, 11 प्रवाशांचा आगीत होरपळून मृत्यू, किंकाळ्यांनी परिसर हादरला

नाशिक, मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी: नाशिक औरंगाबाद मार्गावर नांदूर नाक्याजवळ (मिरची हॉटेल) खासगी बसला लागलेल्या आगीत 11 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे तर काही प्रवासी जखमी झाले आहेत..ही आग एवढी भीषण होती की काही वेळात झालेल्या स्फोटाने परिसरातील नागरिक खडबडून जागे झाले. बसमधील काही प्रवाशांनी खिडकीतून उड्या मारल्या, तर काही आगीतच होरपळले.

पहाटेच्या सुमारास बसमधील अनेक प्रवासी झोपेत असतानाच काळाने घाला घातला. चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या बसमधील मुंबईला जायला निघालेले प्रवासी साखर झोपेत होते. वेळ पहाटे पावण पाच-पाच वाजताची होती. अपघातानंतर बसलेल्या दणक्याने सर्व प्रवाशांचे डोळे उघडले. बसचा अपघात झालाय, हे कळेपर्यंत बसने पेट घेतला होता. बघता बघता बसच्या आतला भाग आगीच्या भक्ष्यस्थानी सापडला.खाजगी बसला आग लागून 11 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.सदर बस ही यवतमाळकडून मुंबईकडे जात होती..बसमध्ये 40 ते 50 प्रवासी होते..

11 जणांचा मृत्यू, 39 प्रवाशी जखमी:
नाशिकमधील बस आग दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती जिल्हाधिकारी गंगाधरन डी यांनी दिली आहे. तर 39 प्रवासी जखमी असून यापैकी एकजण गंभीर जखमी असल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयातून दुसरीकडे पुढील उपचारांसाठी हलवण्यात येणार असल्याचे सांगितले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोहचले असून पाहणी केली जात आहे. पोलिस उपायुक्त अमोल तांबे यांनी या अपघाताची पुष्टी करत माहिती दिली आहे की, ”या आगीत होरपळून काही जणांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं आहे.”

पोलीस यंत्रणा खडबडून जागी, अग्निशमन दल घटनास्थळी:
दरम्यान स्थानिक नागरिकांना बस जळत असल्याचे त्यांनी घटनेची पोलिसांसह अग्निशमन दलाला कळविली. त्यानंतर पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाल्यानंतर घटनास्थळी अग्निशमन दलाचे तीन ते चार वाहने तसेच चार ते पाच रुग्णवाहिका दाखल झाल्या होत्या. साधारणपणे अर्धा तासाहून अधिक काळ पेटलेली बस विझवण्याचा प्रयत्न सुरू होता. बस पेटल्यानंतर ज्या प्रवाशांना बसमधून खाली उतरता आले, त्यांनी उड्या मारल्या तर आगीमुळे अनेक प्रवाशांचा मृत्यू झाला. दरम्यान या घटनेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला असून, अपघातात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!