सहाव्या मजल्या वरून पडल्यामुळे ८ वर्षीय बालकांचा मृत्यू!
Monday To Monday NewsNetwork।
नाशिक, मंडे टू मंडे वृत्तसेवा : शहरातील नाशिकरोड परिसरात आठ वर्षीय बालकाचा सहाव्या मजल्या-वरून पडल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली असून या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
आरव सचिन चवरे (वय 8, रा. ड्रीम सिटी, मँगो बिल्डिंग, 602, आगरटाकळी रोड, पोतदार शाळेच्या मागे, नाशिकरोड) हा बालक काल रात्री सव्वा दहा वाजेच्या सुमारास राहत्या घराच्या सहाव्या मजल्यावरून खाली पडला. यात त्याच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली. त्यामुळे त्याला त्याच्या नातेवाईकांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले; मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मयत घोषित केले. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक दावल करीत आहेत.