भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममहाराष्ट्र

बारमध्ये बसलेल्या १९ जणांवर कारवाई; कोरोना नियमांचे उल्लंघन, बारसुद्धा सील !

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

नाशिक (निशाद साळवे): नाशिक शहरात पोलीस कारवाईच करत नसल्याचा सूर येत होता. त्यामुळे आता नाशिक शहर पोलिसांनी कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा धडाका लावला आहे.

अंबड पोलीस स्टेशन हद्दीतील हॉटेल गंगोत्री बार या ठिकाणी कोरोना नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास येताच पोलिसांनी त्याठिकाणी जाऊन कारवाई केली. पोलीस उप आयुक्त विजय खरात परिमंडळ 2 नाशिक शहर यांच्या सूचनेनुसार सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक नखाते विभाग 3 नाशिक शहर पोलीस निरीक्षक गुन्हे कमलाकर जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे गुन्हे शोध पथक व अंबड पोलीस स्टेशन कडील पोलीस अमलदार असे नाशिक महानगरपालिका यांच्यासोबत हॉटेल गंगोत्री बार मधील एकोणवीस लोकांवर पाचशे रुपये प्रमाणे दंड आकारणी करण्यात आली व सदर हॉटेल गंगोत्री बार हे पुढील आदेशापर्यंत सील करण्यात आले आहे

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!