भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यमहाराष्ट्र

रेमडेसिवीरचा काळाबाजार: ३ नर्ससह एका फार्मासिस्टला अटक !

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

नाशिक (प्रतिनिधी): रेमडेसिवीरचा काळाबाजार करणार्‍या रॅकेटचा आडगाव पोलिसांनी पर्दाफाश केला असून, के. के. वाघ कॉलजेजवळ राज्यात पहिल्यांदाच तरुणींच्या टोळीला अटक केली आहे. यामध्ये तीन नर्स व एका फार्मासिस्टचा समावेश आहे. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून ३ हजारांचे दोन रेमडेसिवीर, मोबाईल, दुचाकी जप्त केली आहे.

जत्रा हॉटेलचौकाजवळ एका फ्लॅटमध्ये तिघी मैत्रिणी राहत आहेत. तिघीही शहरातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून नोकरीस आहेत. तर संशयित कामेश बच्छाव दुसर्‍या खासगी हॉस्पिटलमध्ये फार्मासिस्ट म्हणून नोकरीला आहे. रेमीडिव्हीर घेऊन के. के. वाघ कॉलेजजवळ भेटण्याचे आणि ३ हजारांचे दोन रेमडेसिवीर ५४ हजार रुपयांमध्ये देण्याचे ठरले. त्याप्रमाणे श्रृती उबाळे आणि जागृती शार्दुल रेमडेसिवीर विक्रीसाठी आल्या. पोलिसांनी सापळा रचून त्यांना अटक केली. चौकशीत त्यांनी रेमडेसिवीर विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली. याप्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाचे औषध निरीक्षक सुरेश देशमुख यांनी आडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. न्यायालयाने चौघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

संशयित तीन तरुणी व एका तरुणास वैद्यकीय क्षेत्रात काम करत असल्याने रेमडेसिवीरची मागणी व तुटवड्याची माहिती होती. त्यांना कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या नातेवाईकांना हेरायचे आणि चढ्या भावाने रेमडेसिवीर विकायची कल्पना सुचली. त्यानुसार त्यांनी रुग्णालयातच रेमडेसिवीरचा काळाबाजार सुरु केला. ही बाब आडगाव पोलिसांना समजली. पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून चौघांना अटक केली. तरुणींनी रेमडेसिवीर कोणाकडून आणले. ते किती रुग्णांना विकले. याप्रकरणात आणखी कोण आहे, याचा तपास आडगाव पोलीस करत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!