बनावट पाचशे रूपयांच्या नोटा
प्रकरणी महिला डॉक्टरसह पाच जणांना अटक
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
नाशिक,मंडे टू मंडे वृत्तसेवा। पाचशे रूपयांच्या 291 बनावट नोटा व्यवहारात आणणार्या टोळीचा पदार्र्फाश लासलगाव पोलीसांनी केला असुन 1 लाख 45 हजार रुपये किंमतीच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. याप्रकरणी एका महिला डॉक्टरसह पाच जणांना अटक केल्याने खळबळ उडाली आहे.
लासलगावचे स पो नि राहुल वाघ यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार लासलगाव येथील राहणारे मोहन बाबुराव पाटील व डॉ. प्रतिभा बाबुराव घायाळ (दोघे रा. बोराडे हॉस्पीटलजवळ, लासलगाव) विठ्ठल चंपालाल नाबरीया (रा. कृषीनगर कोटमगाव रोड, लासलगाव) यांचेकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी मित्र रविंद्र हिरामण राऊत (रा. स्मारक नगर, पेठ, ता. पेठ) व विनोद मोहनभाई पटेल (रा. पंचवटी, नाशिक) हे आम्हाला सायंकाळी 500 रुपये किंमतीच्या बनावट नोटा देणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
पोलिस अधीक्षक सचिन पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक माधुुरी कांगणे, पोलीस उपअधीक्षक सोमनाथ तांबे यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार लासलगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ, पोलीस उप निरीक्षक रामकृष्ण सोनवणे, स.पो.उ.नि. राजेंद्र अहिरे, हवालदार बाळु सांगळे , पोलीस नाईक कैलास महाजन , योगेश शिंदे , संदिप शिंदे, पोका प्रदिप आजगे , गणेश बागुल, कैलास मानकर, सागर आरोटे देविदास पानसरे, महिला पोलिस शिपाई मनीषा शिंदे यांच्या पथकाने येवला रोड विंचुर येथे सापळा रचुन मोहन पाटील, प्रतिभा घायाळ , विठ्ठल नावरीया यांना बनावट 500 दराच्या 291 नोटा देण्यासाठी आलेले रविंद्र हिरामण राऊत व विनोद मोहनभाई पटेल हे त्यांचेकडील कार क्रमांक एमएच 03 सीएच 3762 हिचेमध्ये आले असता पंचासमक्ष छापा टाकुन त्यांचेकडुन 500 दराच्या बनावट 291 नोटा व 4 लाख रुपये किंमतीची कार जप्त करण्यात आली. बनावट नोटा व्यवहारात आणण्यासाठी कब्जात बाळगल्या म्हणून या आरोपींविरुद्ध कॉन्स्टेबल प्रदिप आजगे यांनी लासलगाव पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे.