भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमनाशिक

Video| अखेर ८ लाखांची लाच घेणाऱ्या फरार शिक्षणाधिकारी झनकर यांना एसीबीकडून अटक

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

नाशिक, प्रतिनिधी-निशाद साळवे| शिक्षण संस्था चालकांकडून मंजुरीच्या कामासाठी चालकामार्फत 8 लाख रुपयांची लाच लाच खाणं शिक्षणाधिकाऱ्याला चांगलंच भोवलं आहे. नाशिकच्या शिक्षणाधिकारी वैशाली झनकर या लाच प्रकरणात फरार होत्या मात्र, आता पोलिसांच्या जाळ्यात सापडल्या आहे. एसीबीने त्यांना अटक केलीय. त्यामुळे आता त्यांच्या अडचणीत वाढ होणार आहे.

दरम्यान, शिक्षण संस्थेच्या सरकारी अनुदानला मंजुरी देण्यासाठी 8 लाख रुपये लाच घेताना रंगेहाथ पकडल्या गेलेल्या नाशिकच्या शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांचा पाय आणखी खोलात गेलाय. लाचखोर शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांच्याकडे कोट्यवधींची ‘माया’ असल्याचं समोर येतंय. विशेष म्हणजे शासनाने देखील शिक्षण आयुक्तांना वैशाली झनकर यांच्या निलंबनाचे आदेश दिलेत. त्यामुळे आता शिक्षण आयुक्त काय भूमिका घेतात याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय.

शिक्षण अधिकारी वैशाली झनकर यांना अटक केली आहे. मंगळवारी सकाळी फरार झाल्या होत्या. या प्रकरणात शासकीय वाहन चालक आणि एका शिक्षकाला अटक करून न्यायालयासमोर हजर करण्यात आल्याने दोघांनाही दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. दरम्यान, वैशाली झनकर यांनी काल नाशिकच्या न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. त्या अर्जावर आज सुनावणी होणार होती. मात्र त्यापूर्वीच ठाणे एसीबीने धडाकेबाज कारवाई करत वैशाली झनकर यांना बेड्या ठोकल्या. ठाणे अधीक्षक डॉ पंजाबराव उगले यांच्या टीमने वेगाने सूत्रे हलवत वैशाली झनकर यांना अटक करण्यात यश मिळवले. आता झनकर यांना आज कोर्टात हजर करण्यात येणार आहे

आरोपी शिक्षणाधिकारी वैशाली झनकर-वीर या सध्या फरार होत्या. त्यांनी आपली रवानगी तुरुंगात होऊ नये म्हणून प्रयत्न करण्यास सुरुवात केली होती. त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात धाव घेतली होती. यासाठी त्यांनी जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यांच्या वतीने अॅड. अविनाश भिडे यांनी हा अटकपूर्व जामिनासाठीचा अर्ज दाखल केला होता. या अटकपूर्व जामीन अर्जावर शनिवारी (14 ऑगस्ट) सुनावणी होणार आहे.

नेमके काय आहे प्रकरण- शिक्षक संस्थेच्या शाळांना मंजूर झालेल्या 20 टक्के अनुदानातून नियमित वेतन करण्याचे आदेश देण्याच्या मोबदल्यात शिक्षणाधिकारी वैशाली वीर यांनी 8 लाख रुपयांची लाच मागितली होती. शासकीय वाहन चालकाच्या माध्यामातून ही लाच स्वीकारताना नाशिक जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. शिक्षण विभागातील मोठ्या पदावरील अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकल्यानंतर जिल्हा परिषदेत चर्चेला उधाण आलंय. झनकर यांच्यासह यात वाहन चालक आणि एका प्राथमिक शिक्षकाचा सहभाग आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!