भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममहाराष्ट्र

KYC अपडेट करण्यासाठी आला फोने आणि महिलेच्या खात्यातून ११ लाख झाले गायब

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

नाशिक/निशाद साळवे: ऑनलाइन फसवणूक घटना वाढत असून शहरातुन अशीच एक घटना समोर आली आहे. बँकेच्या खात्याचे केवायसी अपडेट करण्याचे कारण सांगून सर्व व्यक्तिगत माहिती विचारून घेतल्यावर ते हॅक करून खात्यातील रक्कम आणि त्याच्याशी संलग्न मुदत ठेवीवर त्वरित मिळणारे ओव्हरड्राफ्ट कर्ज मंजूर करून घेत ११ लाख ७३ हजारांची ऑनलाइन फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये घडला आहे.

शहरातील पल्लवी मंडलिक त्यांचे सरकारी बँकेत खाते आहे. एका अनोळखी मोबाइल क्रमांकावरून त्यांना कॉल आला. बँकेचे प्रतिनिधी म्हणून बोलत असल्याचे सांगत तुमचे बँक खाते केवायसी अपडेट करणे आवश्यक असल्याचे सांगून सर्व माहिती विचारण्यात आली. त्यासाठी एक इ-मेल पाठविण्यात आला. त्याला उत्तर म्हणून सर्व माहिती भरण्यास भाग पाडण्यात आले. त्यानंतर काही वेळातच इंटरनेट बँकिंगचा वापर करून खाते हॅक झाले. त्यातील शिल्लक रकमेबरोबरच खात्याशी संलग्न असलेल्या मुदत ठेवीवर ऑनलाइन ओव्हरड्राफ्ट कर्ज मंजूर करून घेण्यात आले व ही सर्व रक्कम ऑनलाइन पद्धतीने काढून घेण्यात आली. बँकेकडून या कर्जाबाबत विचारणा करण्यात आल्यानंतर फसवणूक झाल्याचे मंडलिक यांच्या लक्षात आले. त्वरित त्यांनी सायबर पोलिस ठाण्यात संपर्क करत अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!