विविहितेच्या तोंडात झोपेच्या गोळ्या कोंबून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न : गुन्हा दाखल !
Monday To Monday NewsNetwork|
नाशिक, प्रतिनिधी : येथे एका विविहिते सोबत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वेरॉसिकल वेन्स सिप्लिसा हा आजार असल्याने वैवाहिक संबंध प्रस्थापित करण्यास सक्षम नसल्याचे माहीत असूनही विवाहितेची फसवणूक करून विवाहितेला त्रास देऊन झोपेच्या गोळ्या तोंडात कोंबून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेची उपनगर पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की नाशिक रोड येथील शिखरेवाडीतील रहिवासी जय हरसुखलाल चव्हाण (वय 35) व इतर तीन नातेवाईकांनी विवाहिता सासरी शिखरेवाडी येथे नांदत असताना जय हरसुखलाल चव्हाण याला वेरॉसिकल वेन्स सिप्लिसा हा आजार असल्याने तो वैवाहिक संबंध प्रस्थापित करू शकत नाही, हे माहीत असूनही पती, सासू व सासरे यांनी संगनमताने हा आजार लपवून विवाहितेच्या आईवडिलांकडून पैसे लुबाडण्यासाठी त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर विवाहितेला शारीरिक व मानसिक त्रास देऊन वारंवार पैशांची मागणी सुरू झाली. जय चव्हाण याने तिच्या तोंडात झोपेच्या गोळ्या कोंबून तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम 498 (अ), 307, 420, 406, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी अधिक तपास करीत आहेत.