भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमनाशिक

नाशिक हादरलं ! दिराने २५ ते ३० वेळा चाकू खूपसून केला भावजायीचा खून

नाशिक, प्रतिनिधी : नाशिकमध्ये भीषण हत्याकांड घडलं आहे. ऐन दिवाळीत एका महिलेची चाकूने वार करुन हत्या केल्याची घटना समोर आली आहे. मृतक महिलेचं नाव पूजा आंबेकर असं असल्याची माहिती समोर आली आहे. रात्री ११ वाजेदरम्यान किरकोळ कारणातून दिराने धारदार चाकूने ३० ते ३५ सपासप वार करत भावजयीचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, संतोष आंबेकर याच्यावर दोन खूनाचे गुन्हे दाखल आहेत. तो तुरुंगात शिक्षा भोगत आहे. तो काही दिवसांपूर्वी तुरुंगातून बाहेर आला होता. मृत महिला पूजा आंबेकर पतीपासून काही दिवसांपासून वेगळी राहत होती. दरम्यान, ती दिर संतोष आंबेकरसोबत २० दिवसांपासून खोली भाड्याने घेऊन राहू लागली. बुधवारी रात्री ११ वाजेदरम्यान दोघांमध्ये किरकोळ कारणावरुन वाद झाला. राग अनावर झाल्याने संतोषने पूजावर धारदार चाकूने ३० ते ३५ सपासप वार केले. त्यात ती रक्ताच्या थारोळ्यात पडली.

त्यानंतर संतोष आंबेकर घटनास्थळावरुन पळून गेला. ही बाब गंगापूर पोलिसांना समजताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी महिलेला उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासणी करत तिला मृत घोषित केले. संबंधित संशयित आरोपी हा अट्टल गुन्हेगार आहे. त्याच्यावर यापूर्वी शहरात दोन खुनाचे गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणी गंगापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून गंगापूर पोलीस या संशयित आरोपीचा शोध घेत आहेत. दरम्यान ऐन दिवाळीत झालेल्या या घटनेने संपूर्ण नाशिक जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!