भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममहाराष्ट्र

पतीला ठार मारण्याची धमकी देत विवाहितेवर बलात्कार; महीला गर्भवती !

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

नाशिक (निशाद साळवे): पतीला मारून टाकण्याची धमकी देत एकाने विवाहितेवर वारंवार बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पीडित महिलेने सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी ख्रिश्चनवाडी, कॅनडा कॉर्नर येथील संशयित पॉली शांतवन जाधव (वय ३०) यास अटक केली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, तुझ्या पतीला मारून टाकील अशी धमकी संशयिताने पीडितेला दिली. त्याने जानेवारी २०१९ ते २० मार्च २०२१ या कालावधीत कॅनडा कॉर्नर येथील सार्वजनिक शौचालयाजवळील पडीक खोलीत मारहाण करत वारंवार बलात्कार केला. त्यातून पीडित महिला दीड महिन्याची गर्भवती राहिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रियंका गायकवाड करत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!