भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममहाराष्ट्र

भयंकर ! सावत्र आईकडून अमानुषपणाचा कळस ; रागाच्या भरात मुलांच्या गुप्तांगावर चटके

मंडे टू मंडे वृत्तसंकलंन।

नाशिक, प्रतिनिधी : येथील दिंडोरी तालुक्यात आई कडून मुलाचा छळ केला जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. सावत्र आईने तिच्या अल्पवयीन मुलाचा अमानुषरित्या छळ केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हा मुलगा मुकबधीर असून रागाच्या भरात सावत्र आईने मुलाच्या गुप्तांगावर चटके दिले. या घटनेमुळे नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक असे, येथील दिंडोरी तालुक्यातील निळवंडी पाडे या गावात रहिवासास असलेल्या सावत्र आईकडून मुलाच छळ केला जात होता. मात्र, सोमवारी या महिलेने अमानुषपणाचा कळस गाठत रागाच्या भरात मुलाच्या गुप्तांगाला चटके दिल्याचा निर्दयी कृत्य केले तसेच मुलाला बेदम मारहाणही केल्याने या मुलाची प्रकृती बिघडल्याने गावांतील नागरिकांनी या अल्पवयीन मुलाला नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले असून मात्र, आता पोलीस या निर्दयी कृत्य केलेल्या महिलेवर याप्रकरणात काय कारवाई करतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!