भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमनाशिक

बँकेचा कस्टमर केअर नंबर शोधणे पडले महागात, सव्वा लाखाची फसवणूक

नाशिक, प्रतिनिधी : बँकेचा कस्टमर केअर नंबर शोधत असताना बँक खातेदाराची माहिती घेत ऑनलाइन सव्वा लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार त्र्यंबकेश्वर येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी ग्रामीण पोलिस दलाच्या सायबर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.

रुपेश तिवारी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, शनिवारी (दि. २३) एचडीएफसी बँकेचा कस्टमर केअर नंबरचा गुगलवर शोध घेतला. याठिकाणी बँकेचा बनावट कस्टमर केअर नंबर मिळाला. या नंबरवर फोन करत ‘बँकने २४७३ रुपये माझ्याकडून जास्त घेतले गेले’ असे तिवारींनी सांगितले असता संशयिताने रक्कम परत करतो असे सांगत अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले व आयडी विचारला. तिवारींनी आयडी देताच त्यांचा मोबाइल हॅक करत ४९ हजार रुपये दोनदा व २१ हजार ५५५ असे सुमारे सव्वा लाख रुपये ऑनलाइन काढून घेत फसवणूक केली. दरम्यान, तिवारी यांचे बंधू एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असून त्यांची प्रकृतीशी झुंज सुरू असतानाच तिवारींची फसवणूक झाल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. याप्रकरणी ग्रामीण पोलिस दलाच्या सायबर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!