क्राईममहाराष्ट्र

तब्बल १ कोटी रुपयांचा गुटखा जप्त ! ग्रामीण पोलिसांची कारवाई

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

नाशिक (प्रतिनिधी)। नाशिक ग्रामीण पोलिसांनी गुटखा कार्यवाई करत तब्बल १ कोटी २४ लाख ३४ हजार ७३० रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. राजस्थानहून नाशिककडे दोन कंटेनर अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करत असल्याची गुप्त माहिती नाशिक पोलिसांना मिळाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री करंजखेड परिसरात सापळा रचून पोलिसांनी २ कंटेनर ताब्यात घेत त्यांची झडती घेतली असता मिराज कंपनीचा प्रतीबंधीत गुटखा पोलिसांना मिळून आला. महेंद्रसिंह सोलंकी, श्यामसिंह राव, अर्जुनसिंह राणावत आणि लोगलजी मेहवाल या सर्व राजस्थानच्या चौघांना वणी पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे, त्यांच्याकडून एकूण १ कोटी ६४ लाख ३४ हजार ७३० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे, अधिक तपास नाशिक ग्रामीण पोलिस करताहेत. 

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!