भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममहाराष्ट्र

सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष देत; १८ लाखाचा गंडा !

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

नाशिक (प्रतिनिधी): शहरातील पंचवटी परिसरातील एका व्यक्तीला व त्याच्या भाच्याला सरकारी नोकरीचे आमिष देऊन, २ इसमांनी तब्बल १८ लाख रक्कम वेळोवेळी उकळल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, फिर्यादी बाबाजी रामजी केदारे (वय ३६, रा.हनुमाननगर, पंचवटी नाशिक) यांना २ इसमांनी (दि.१ नोव्हेंबर २०१४) रोजी सरकारी नोकरीचे आमिष दिले. तसेच (दि.१२ मे २०१६) या वर्ष्यापर्यंत, संशयित आरोपी रमेश मोतीगिरी गोसावी (नेमणूक, शहर वाहतूक शाखा, नाशिक) व सचिन भाऊसाहेब म्हस्के (रा.वैजूबाभूळ जि.अहमदनगर) यांनी फिर्यादी व त्यांचा भाचा याच्याकडून वेळोवेळी पैसे उकळले. संशयित आरोपींनी फिर्यादी व त्यांचा भाचा स्वप्निल महेंद्र बागुल यांना रेल्वेत नोकरी लावून देतो असे सांगून, ईस्टर्न रेल्वे, गव्हर्मेंट ऑफ इंडिया नावाने असलेली टी.सी.पदासाठी सिलेक्शनची बनावट ऑर्डर दिली. फिर्यादी व भाचा स्वप्निल यांच्याकडून आरोपींनी विश्वास संपादन करून वेळोवेळी प्रत्येकी ९ लाख असे १८ लाख रुपये उकळून फसवणूक केली अशी तक्रार दाखल करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!