नाशिकमध्ये अनधिकृत स्थळावर कारवाईस सुरवात, मोठा पोलीस बंदोबस्त तैनात
नाशिक, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क | नाशिक – पुणे रोडवरील काठे गल्ली (Kate Galli) परिसरातील अनधिकृत दर्गा स्थळाचा वाद 25 वर्ष पाठपुरावा करून ही महापालिका (Nashik NMC) अनधिकृत धार्मिक स्थळ हटवित नसल्याने हिंदुत्ववादी संघटनानी आंदोलनाचा इशारा दिला होता. हे अनधिकृत बांधकाम पाडलं नाही, तर सकल हिंदू समाजाने आंदोलनाचा इशारा दिला होता. पण हे आंदोलन होण्यापूर्वीच नाशिक महानगरपालिका प्रशासन अॅक्शन मोडमध्ये आलं आहे. यानंतर आता काठे गल्ली परिसरातील अनधिकृत धार्मिक स्थळ हटविण्याच्या कारवाईला महापालिका प्रशासनाकडून सुरुवात झाली आहे.
नाशिक – पुणे रोडवरील काठे गल्ली परिसरातील एक धार्मिक स्थळ 25 वर्ष पाठपुरावा करून ही महापालिका हटवित नसल्याने हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. काठे गल्ली परिसरात अनधिकृत धार्मिक स्थळ उभारण्यात आल्याचा हिंदुत्ववादी संघटनांनी आरोप करण्यात आला होता. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काठे गल्ली परिसरात तगडा पोलीस (Nashik Police) बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
जमावबंदी लागू
या परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न जटिल होऊ नये म्हणून शहर पोलिसांनी मुंबई नाका व भद्रकाली पोलिसांच्या हद्दीतील काठे गल्लीसह द्वारका भागात शनिवारी जमावबंदी लागू केल्याचे आदेश पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी जारी केले आहेत. विशेष म्हणजे, शनिवारी पुणे रोडवरील द्वारका ते काठे गल्ली व आसपासचे अनेक रस्ते कायदा व सुव्यवस्था आणि वाहतुकीच्या कारणास्तव बंद करण्यात आले असून, वाहने पर्यायी मार्गाने नेण्याचे आवाहन करण्यात आले आहेत.
तर आज हिंदुत्ववादी संघटनांच्या आंदोलनाआधी काठे गल्ली परिसरातील अनधिकृत धार्मिक स्थळ हटविण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. महापालिका प्रशासनाकडून अनधिकृत धार्मिक स्थळाविरोधात मोठ्या पोलीस बंदोबस्तात कारवाई करण्यात येत आहे. परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या धार्मिक स्थळाच्या दिशेने जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत.