भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमनाशिक

फक्त वीस रुपयांसाठी मजुराची गळा चिरून हत्या,आरोपीला बेड्या ठोकल्या

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

नाशिक,मंडे टू मंडे वृत्तसेवा। नाशिकमधील पंचवटीतल्या सेवाकुंज परिसरात ब्लेडने वीस रुपयांसाठी मजुराची गळ्यावर वार करत हत्या केल्याची घटना घडली. शुक्रवारी रात्री साडे-आठच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी संशयीत आरोपी पंडित उर्फ पंड्या उर्फ लंगड्या रघुनाथ गायकवाड (वय ३२) याला ताब्यात घेतले आहे. वीस रुपये दिले नाही म्हणून गळा कापल्याची त्याने कबुली दिली. तो सराईत गुन्हेगार असल्याची माहिती समोर आली आहे.

या घटनेविषयी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मजूर सुनील (वय ४०) हा मोनू श्यामलाल बनसोड उर्फ सागर बाबा आणि बिनेश शुभम नायर यांच्यासोबत पाच ते सहा महिन्यांपासून रामरतन लॉजच्या समोरच्या भागात रात्री येऊन झोपत होते. ते शुक्रवारी रात्री तेथे आल्यानंतर तेथे आरोपी पंडीत गायकवाड आला, त्याने सुनील याच्याकडे वीस रुपयांची मागणी केली. त्याला पैसे दिले नाही. त्यामुळे त्याने त्याच्याजवळील कटरने सुनीलच्या गळ्यावर वार केला. गळ्यावर वार झालेला सुनील जुना आडगाव नाका येथून वाल्मिकनगरातून सेवाकुंज येथे येऊन पडला.

याबाबत पोलिसांना माहिती कळताच जखमी सुनीलला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, अधिक रक्तस्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाला. तो ज्या मार्गाने आला होता. त्या मार्गावर रक्ताचे थेंब पडलेले होते. पोलिसांनी त्याचा माग काढत अखेर ही घटना रामरतन लॉजच्या समोरच्या भागात घडल्याचे निष्पन्न झाले. तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात पेट्रोलपंपावर एकजण हात धुत असल्याचे दिसले. त्यावरून त्याचा तपास केल्यानंतर पोलिसांनी सागर बनसोडला ताब्यात घेतले. त्याच्यासोबतचा दुसरा बिनेश नायर याचा शोध घेऊन पोलिसांनी त्याची चौकशी केली असता हा वार दोघांनी केला असल्याचे समजले. त्यांनी सांगितलेल्या वर्णनावरून आणि कपड्यांवरून पोलिसांनी तपास करीत तपोवनातील उद्यानात संशयीत पंडित गायकवाडला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे दरम्यान वीस रुपये दिले नाही म्हणून गळा कापल्याची संशयीताने कबुली दिली असून तो सराईत गुन्हेगार असल्याचीही माहिती समोर आली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!