आरोग्यमहाराष्ट्र

धक्कादायक ; नाशिक मध्ये चक्कर येऊन पडल्याने १२ ते १३ जणांचे मृत्यू

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

नाशिक (प्रतिनिधी)। देशात कोरोनाचा कहर मोठ्याप्रमाणावर सुरू असताना नाशिक शहरात गेल्या काही दिवसांत चक्कर येऊन पडल्याने १२ ते १३ जणांचे मृत्यू झाल्याच्या नोंदी पोलीस ठाण्यात झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

अर्थात, अशा प्रकारे मृत्यू होण्याची नेमकी कारणे काय आहेत आणि कोणत्या डॉक्टरानी त्यांची तपासणी केली होती, याबाबत कोणताही तपशील उपलब्ध नसल्याचं स्पष्टीकरण महापालिकेच्या वतीनं देण्यात आलं आहे. मागील आठ दिवसात १३ बळी, तर गुरुवारी दिवसभरात ९ जणांचा बळी गेल्याची धक्कादायक माहिती समोर आल्याने हा कोरोनाचा कोणता नवा प्रकार आहे का ? ही शंकादेखील उपस्थित केली जात आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!