भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमनाशिक

डेअरी कंपनीचे ऑफीस फोडून १ लाख ८५ हजाराचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास !

Monday To Monday NewsNetwork :

नाशिक, प्रतिनिधी : येथील इंदिरानगर परिसरातील सुमन पेट्रोल पंपाच्या जवळील एका डेअरी कंपनीचे ऑफीस फोडून 1 लाख 85 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबवल्याची घटना उघडकीस आली आहे.

याबाबत अधिक असे, इंदिरानगर येथील सुमन पेट्रोल पंपाच्या मागे पॉवर डेअरी लिमिटेड या कंपनीचे ऑफिस आहे. काल रात्रीच्या वेळेस अज्ञात चोरट्याने या ऑफिसच्या मागील बाजूचा पत्रा तोडून ही चोरी झाली. या ऑफिस मधील टेबलच्या ड्रॉवरचे लॉक तोडून, त्यातील 1 लाख 75 हजार 244 ही रक्कम तसेच ऑफिस मध्ये ठेवलेले 10 हजार 620 रुपये किमतीचे डेअरी प्रॉडक्ट तुपाचे 36 डबे असा एकूण 1 लाख 85 हजार 864 रुपयांचा ऐवज चोरून नेला. अशा अर्थाची फिर्याद दीपक दिलीप आव्हाड यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात दिली. भा. दं. वि कलम 457, 380 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक उघडे पुढील तपास करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!