चाळीस हजाराची लाच भोवली : तालुका भूमिअभिलेख अधिक्षकास अटक
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
नाशिक,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। जागा एन. ए. करण्या संदर्भात नाशिक जिल्ह्यातील नांदगाव भूमिअभिलेख कार्यालयातील तालुका अधिकाऱ्यास लाचलुचपत विभागाने सापळा रचून चाळीस हजार रुपयांची लाच स्वीकारतांना रंगेहात अटक केली .
या संदर्भात अधिक माहिती अशी की, जागा एन. ए. करण्यासाठी नांदगाव येथील भूमिअभिलेख विभागाचे तालुका अधीक्षक विलास दाणी यांनी जागा एन. ए. करण्यासाठी चाळीस हजार रुपयांची मागणी केली होती. परंतु संबधित तक्रारदाराने लाच न देता त्याने लाचलुचपत विभागाशी संपर्क साधून लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून नांदगाव तालुका अधीक्षक विलास दाणी यांना चाळीस हजार रुपयांची लाच स्वीकारतांना रंगेहाथ पकडून अटक केली .या बाबत पुढील कारवाई सुरू आहे