४० लाख रुपयांची लाच मागितल्याचा प्रांताधिकाऱ्यावर गुन्हा दाखल
नाशिक,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। एका खाजगी कंपनीची जमीन अकृषिक (NA) करून देण्यासाठी दिंडोरीचे प्रांताधिकारी डॉ निलेश अपार यांनी ४० लाख रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्याविरुध्द दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिंडोरी तालुक्यातील लखमापूर येथील एका कंपनीच्या मालकाकडे जागा कायम करण्यासाठी प्रांत अधिकारी अपार यांनी ४० लाख रुपयांची मागणी केली होती. कंपनीचे बांधकाम करताना त्याची अकृषिक परवानगी न घेतली असल्याने प्रांताधिकाऱ्यांनी त्यांना नोटीस बजावली होती,व कंपनीचे उत्पादन बंद करण्याचे तोंडी सांगितले होते , परंतू दरम्यान, तक्रारदार यांची लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे संबंधिताने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रीतसर तक्रार नोंदवली. या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
सदर कंपनीविरुद्ध कारवाई न करण्यासाठी तसेच बंद कंपनी पुन्हा सुरू करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे ५० लाखाची मागणी केली. यानंतर तडजोडी अंती ४० लाख रुपयांची मागणी करून स्विकारण्याची तयारी दाखविली म्हणून डॉ निलेश अपार, वय 37 वर्ष, व्यवसाय – उपविभागीय अधिकारी, वर्ग 1, उपविभाग दिंडोरी, जि. नाशिक
रा. स्वामी बंगला, शासकीय विश्रामग्रह दिंडोरी, जि. नाशिक . यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई सापळा अधिकारी नरेंद्र पवार, पोलीस उप अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक, यांच्यासह पो.नि. संदिप साळुंखे. पो.हवा. डोंगरे ,पो.हवा. इंगळे यांनी केली .