२८ लाख रुपयांची लाच घेताना पकडलेल्या अधिकाऱ्यांच्या घरात ACB चा छापा, नोटा मोजण्यासाठी मागवल्या मशीनी
नाशिक,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। तब्बल 28 लाख रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आलेल्या नाशिक जिल्ह्यातील आदिवासी विभागाच्या अधिकाऱ्याकडे कोट्यावधी रुपये सापडल्याची माहिती समोर आली आहे. आदिवासी विभागाचे कार्यकारी अभियंता दिनेश कुमार बागुल यांच्या घरांची एसीबीकडून झाडाझडती करण्यात आली. यावेळी कोट्यावधी रुपये सापडल्याची माहिती आहे. दरम्यान एसीबीकडून अद्यापही कारवाई सुरू आहे पुढील काही काळात मोठी रक्कम हस्तगत करण्यात येण्याची शक्यता आहे. नाशिक, पुणे, मुंबई आणि धुळ्यातील घरांवर ACB चे छापे टाकण्यात आले आहेत.
आदिवासी विभागाचा कार्यकारी अभियंता दिनेश कुमार बागुल याच्या घरांवर छापेमारी करत नाशिक अँटी करप्शन विभागाने मोठी कारवाई केली होती. याच कारवाई अंतर्गत बागुल यांच्या नाशिक, पुणे, मुंबईसह धुळ्यातील घरांवरही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने छापेमारी सुरु केली आहे. या छापेमारीत आता धक्कादायक माहिती समोर आली आहे, एका आदिवासी विभागाच्या अधिकाऱ्याच्या घरी केलेल्या छापेमारीमध्ये करोडो रुपयांची रोकड सापडल्याची माहाती मिळत आहे.
तर या अधिकाऱ्याची इतर घरे आणि लॉकरची मोजदात अद्याप झालेली नसून रोकड, सोने, बेनामी संपत्ती अशी कोट्यावधी रुपयांची माया जमवल्याचा ACB ला संशय आहे.तसंच दिनेश कुमार बागुल याच्याशी संबंधित असलेले अधिकारी आणि कर्मचारी देखील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या रडारवर आहेत. या अधिकाऱ्याच्या घारामध्ये एवढी रोख रक्कम सापडली आहे की, ती रोख रक्कम मोजण्यासाठी पैसे मौजण्याची मशीन मागवण्यात आल्या आहेत.
आदिवासी विभागाचा कार्यकारी अभियंता दिनेश कुमार बागुल याला तब्बल 28 लाख रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली होती. सेंट्रल किचन बिल मंजुरीसाठी ही लाच मागितली होती.