भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमनाशिक

कृषी अधिकारी ५० हजराचा बळी, लाच घेताना रंगेहात अटक

नाशिक, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। उत्पादित केलेली यंत्रे ही अनुदानास पात्र नसल्याचे भासवून उत्पादित केलेल्या कृषी यंत्रावर कृषी विभागाकडून अनुदान मिळवून देण्याच्या मोबदल्यात ५० हजार रुपयांची लाच घेताना अण्णासाहेब हेमंत गागरे या तालुका कृषी अधिकाऱ्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना रंगेहात अटक केली .

याबाबत अधिक माहिती अशी की,अण्णासाहेब हेमंत गागरे हे सिन्नर तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी असून त्यांच्याकडे निफाड तालुक्याचा अतिरिक्त पदभार आहे. तक्रारदार हे सिन्नर एमआयडीसीत शेती यंत्रे व अवजारांचे उत्पादन करतात. त्यांनी उत्पादित केलेल्या यंत्रे व अवजारांच्या खरेदीवर शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून अनुदान वितरित करण्यात येत असते.

परंतु गागरे यांनी तक्रारदाराकडून उत्पादित केलेली यंत्रे ही अनुदानास पात्र नसल्याचे भासवून तक्रारदार यांना त्यांनी उत्पादित केलेल्या यंत्रावर कृषी विभागाकडून अनुदान मिळवून देण्याकरिता तक्रारदाराकडून ४ लाख रुपये लाचेची मागणी केली. तडजोडी अंती रू २ लाख लाच घेण्याचे निश्चित केले. त्यातील लाचेचा पहिला हफ्ता म्हणून ५० हजार रुपयांची लाच घेताना अण्णासाहेब हेमंत गागरे वय ४२ वर्ष पद तालुका कृषी अधिकारी (वर्ग- २ राजपत्रित) सिन्नर तालुका (अतिरिक्त कार्यभार निफाड तालुका) जिल्हा नाशिक रा. प्राइड ग्लोरी अपार्टेंट, नाशिक रोड, नाशिक याना रंगेहात पकडण्यात आल. ही कारवाई २१ एप्रिल रोजी करण्यात आली.ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक चे उपअधीक्षक अभिषेक पाटील, ASI सुखदेव मुरकुटे, PN मनोज पाटील यांनी केली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!