मविप्रच्या कृषि महाविद्यालयात विद्यार्थ्यांना मधमाशी पालनाचे धडे
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
नाशिक,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। जगामध्ये जे देश कृषि उत्पादनात अग्रेसर आहेत त्या प्रत्येक देशात मधमाशीचे पिक उत्पादनात असलेले महत्त्व तेथील शेतकऱ्यांना कळल्यामुळेच पिक उत्पादन जास्त आहे.भारत देशात पण दुसरी हरिक्रांती होण्यासाठी मधमाशीचे महत्त्व सर्व शेतकऱ्यानंपर्यंत पोहचणे गरजेच आहे.
त्या अनुषंगाने नाशिक येथील गंगापूर रोडवरील मराठा विद्या प्रसारक समाज कर्मयोगी दुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यालयात व्यावसायिक मधमाशीपालन हा अभ्यासक्रम अंतिम सत्राच्या विद्यार्थ्यांसाठी प्रथमच सुरु करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमाद्वारे विद्यार्थ्यांंना मधमाशी पालन कशा पद्धतीने करावे,मधाव्यतिरिक्त मधमाशी पालनातुन मिळणारे इतर उपपदार्थ जसे की मेन,पराग,राजान्न,बी वेनोम इ. चे उत्पादन कसे घ्यावे तसेच मधमाशीद्वारे होणार्या परागीभवनाद्वारे कशा पद्धतीने पीक उत्पादनात भरघोस वाढ होते याबद्दल माहिती देण्यात येत आहे.या बाबत मविप्र संस्थेच्या सरचिटणीस निलिमाताई पवार, शिक्षणाधिकारी डॉ एन.एस. पाटील, प्राचार्य आय.बी चव्हाण व कीटकशास्त्रज्ञ डॉ. दिपक शिंदे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.