मोठी कारवाई ; १ कोटी २८ लाख किमतीचा गुटखा जप्त
मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। महाराष्ट्रात बंदी असलेल्या गुटख्याची वाहतूक करणारी दोन वाहने नाशिकहून मुंबईच्या दिशेने येत असताना पोलिसांनी ताब्यात घेऊन मोठी कारवाई करत यातून एक कोटी अठ्ठावीस लाखाचा गुटका जप्त करण्यात आला.
इगतपुरी जवळ ग्रँड परिवार हॉटेल समोर १ कोटी २८ लाख किमतीच्या १७८ गोण्या गुटखा जप्त केला आहे. यासह लाखो रुपये किमतीची २ वाहने सुद्धा ताब्यात घेण्यात आली आहेत, वाहनचालक सलमान अमीन खान (वय ३२), इरफान अमीन खान (वय ३१ रा. हरियाणा) यांना अटक करण्यात आली आहे.
पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांनी आपल्या पथकातील अधिकाऱ्यांमार्फत सापळा रचून दोन मोठे वाहन पकडून झाडाझडती घेतली. त्यात मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित अन्न पदार्थांचा साठा आढळून आला. SHK Premium आणि 4K (STAR) ह्या गुटख्याच्या एकूण १७८ गोण्या जप्त करण्यात आल्या. १ कोटी २८ लाख किमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे. इगतपुरी पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान संहितेचे विविध कलम आणि अन्न सुरक्षा मानके कायद्यातंर्गत इगतपुरी पोलिसस्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या पथकात इगतपुरीचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांच्या नेतृत्वाखालील सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान राखोंडे, ढोकरे, सचिन देसले, मुकेश महिरे, खराटे, संवत्सर, अहिरे, रुद्रे, पोटींदे, बागुल आदींनी ही मोलाची कामगिरी केली.