भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

नाशिकराजकीय

मोठी बातमी : उद्धव ठाकरे याना मोठा धक्का, माजी मंत्र्यांचा व्हाट्सअप द्वारे राजीनामा

नाशिक, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे जळगाव दौऱ्यावर असताना दुसरीकडे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपनेते बबनराव घोलप यांनी राजीनामा दिला आहे. बबनराव घोलप यांनी उद्धव ठाकरेंना व्हॉट्सअॅपद्वारे राजीनामा पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.उद्धव ठाकरेंचे विश्वासू अशी बबनराव घोलप यांची ओळख आहे. माजी मंत्री असलेले बबन घोलप हे देवळाली मतदारसंघातून पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. त्यामुळे त्यांचा राजीनामा हा ठाकरे गटासाठी धक्का समजला जात आहे.

शिर्डी येथे नव्या संपर्कप्रमुखांची निवड केल्याने तसेच भाऊसाहेब वाकचौरे यांना लोकसभेचं तिकीट जवळपास निश्चित मानले जात असल्याने बबनराव घोलप नाराज असल्याची चर्चा आहे. या नाराजीतूनच त्यांनी राजीनामा दिला असावा असं म्हटलं जात आहे. दरम्यान, बबनराव घोलप सध्या आऊट ऑफ कव्हरेज आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार शिवसेनेतील फुटीनंतर उद्धव ठाकरेंनी बबनराव घोलप यांना लोकसभेच्या उमेदवारीचे आश्वासन दिले होते. घोलप यांना शिर्डी लोकसभा मतदारसंघात संपर्क प्रमुख नेमून नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्याच्या उद्धव यांनी सूचनादिल्या होत्या. मात्र उद्धव ठाकरे यांनी जुन्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन भाऊसाहेब वाकचौरे यांच्या उमेदवारीवर परस्पर शिक्कामोर्तब केल्याने बबनराव घोलप अस्वस्थ होते. यानंतर बबनराव घोलप यांनी मातोश्रीवर धाव घेतली होती. उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर नाराजी व्यक्त केली होती. तसंच वाकचौरे यांच्या संभाव्य उमेदवारीला देखील विरोध केला होता.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!