सर्वात मोठी बातमी ; साडेतीन महिन्यांपूर्वी रुजू झालेल्या तहसीलदाराला १५ लाखांची लाच घेताना रंगेहात अटक
नाशिक, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। अवघ्या साडेतीन महिन्यांपूर्वी रुजू झालेले नाशिकचे तहसीलदार नरेश बहिरम यांना तब्बल १५ लाखांची लाच घेताना नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली या मुळे मोठी खळबळ उडाली आहे.
नाशिकचे तहसीलदार नरेशकुमार तुकाराम बहिरम, वय् – ४४ वर्ष, धंदा – तहसीलदार नाशिक, सध्या रा. फ्लॅट नंबर -६०४, बी विंग, मेरिडियन गोल्ड, कर्मयोगी नगर, नाशिक यांनी गौण खनिज प्रकरणातील दंडाची रक्कम माफ करण्यासाठी लाचेची मागणी केली होती.
राजुर बहुला तालुका जिल्हा नाशिक येथील जमिनीच्या मालक यांच्या जमिनीमध्ये मुरुम उत्खनना बाबत मूल्य नियमानुसार पाचपट दंड, स्वामित्वधन जागा भाडे मिळून एकूण रक्कम १,२५,०६,२२०/- याप्रमाणे दंड आकारणी केले बाबत तहसीलदार यांच्या कार्यालयाकडील आदेश आले होते. त्या आदेशाविरुद्ध जमिनीच्या मालक यांनी उपविभागीय अधिकारी, नाशिक यांच्याकडे अपील दाखल केले होते त्याबाबत आदेश होऊन सदरचे प्रकरण पुनश्च फेर चौकशीसाठी नरेशकुमार बहिरम, तहसीलदार नाशिक यांच्याकडे पाठवण्यात आले होते.
सदर मिळकती मधील उत्खनन केलेला मुरूम त्याच जागेत वापर वापर झाल्याचे जमिनीच्या मालक यांनी त्यांचे कथनात नमूद केले होते. सदर बाबत पडताळणी करणे कामी तहसीलदार यांनी जमिनीच्या मालक यांना त्यांच्या मालकीच्या राजुर बहुला तालुका जिल्हा नाशिक येथे स्थळ निरीक्षण वेळी बोलावले होते. परंतु जमिनीच्या मालक या वयोवृद्ध व आजारी असल्याने त्यांनी यातील तक्रारदार यांना त्यांच्या वतीने कायदेशीर कारवाई कामी अधिकार पत्र दिल्याचे दिल्याने ते तहसीलदार यांना स्थळ निरीक्षण वेळी भेटली असता त्यांनी तक्रारदार यांच्याकडे तडजोडीअंती १५ लाख रुपये लाचेची मागणी केली ,आज दिनांक ०५/०८/२०२३ रोजी लाच स्वीकारली म्हणून आरोपी बहिराम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे कामकाज सुरू आहे
नरेश बहिरम यांची नुकतीच १४ एप्रिल २०२३ ला नाशिकला तहसीलदार म्हणून नियुक्ती झाली होती. त्यानंतर अवघ्या साडेतीन महिन्यांत ते लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले.
ही कारवाई संदीप घुगे, पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक, स्वप्नील राजपूत, पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक, पो. ना. गणेश निबाळकर, पो. ना. प्रकाश महाजन, पो. शि. नितीन नेटारे.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा