बालविवाह प्रकरणी, बालविवाह प्रतिबंध अधिनियम अंतर्गत ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल !
Monday To Monday NewNetwork।
नाशिक (प्रतिनिधी): शहरातील सातपूर पोलीस स्टेशन येथे वधू अल्पवयीन असतानाही विवाह लावुन दिल्या प्रकरणी पाच जणांविरुद्ध बालविवाह प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, वधू अल्पवयीन असल्याचे माहीत असतानाही संशयित राजू ऊर्फ राजेंद्र बाळू कुर्हाडे, बायजाबाई राजेंद्र कुर्हाडे, अविनाश प्रभाकर काळे, प्रभाकर काळे, उषाबाई प्रभाकर काळे व त्यांचे इतर नातेवाईकांना सातपूर येथे मंगळवारी चांदवड पोलीस ठाण्यात वधू अल्पवयीन असल्याची समज दिलेली असतानाही सदरील संशयितांनी त्या विवाहास प्रतिबंध न करता त्यांचा बालविवाह लावुन दिल्याने याप्रकरणी बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६ कलम ९, १०, ११ प्रमाणे सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राठोड अधिक तपास करीत आहेत.