अनैसर्गिक कृत्यासाठी अल्पवयीन मुलाचे अपहरण करुन हत्या : आरोपी गजाआड !
Monday To Monday NewsNetwork|
नाशिक/निशाद साळवे : जिल्ह्यातील मालेगाव शहरातील नवा आझादनगर भागातून अल्पवयीन मुलाचे अपहरण करून त्याची हत्या करण्यात आली होती. या घटनेने मालेगाव शहर हादरलं होतं. अखेर नराधम आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. घटनेच्या दोन आठवड्यानंतर खुनाची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.
याबाबत सविस्तर असे की, मालेगाव येथील नवा आझादनगर भागातून २२ मे रोजी १२ वर्षाचा अल्पवयीन मुलगा अरसलान शेख सलिम बेपत्ता झाला त्यानंतर दोन दिवसानी अरसलानचा मृतदेह जाफरनगर येथील बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर संशयास्पदरित्या आढळून आला आपल्या मुलाचा घातपात करण्यात आल्याचा कुटुंबियांना संशय होता. तसा संशय त्यांनी पोलिसांजवळ व्यक्त केल्या नंतर आझाद नगर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करत तपासाची चक्रे फिरवली असता संशयित फैजाण अखतर या २० वर्षीय तरुणाला पहिल्यांदा पोलिसांनी ताब्यात घेत चौकशी केली असता अनैसर्गिक कृत्य करण्यासाठी मुलाचे अपहरण केले मात्र त्याने विरोध केल्याने त्याच्या डोक्यात दगड मारून खून केला व मृत्यदेह इमारतीवर नेऊन टाकल्याची कबुली आरोपीने पोलिसांना दिली, अशी माहिती नाशिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी दिली आहे.