नाशिक जिल्ह्यात भूकंपाचे धक्के , शहर वासियांना मध्ये खळबळ
नासिक,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। नाशिक शहरापासून जवळ असलेल्या दिंडोरी तालुक्यामध्ये संध्याकाळच्या वेळेस भूकंपाचे धक्के जाणविले आहेत.
मेरी येथील वेद शाळेमध्ये असलेल्या रिक्टर स्केल वर या भूकंपाची नोंद झाली असून तिची तीव्रता 3.5 आहे. त्याचा मध्यबिंदू नाशिकपासून जवळ असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
नाशिक शहरात आणि जिल्ह्यामध्ये सातत्याने सुरू झालेल्या पावसानंतर आता भूकंपाचा धक्काही जाणवल्यामुळे शहर वासियांना मध्ये खळबळ उडाली आहे.
नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील , दिंडोरी शहर, मडकीजांब , हातनोरे, निळवंडी , जांबुटके, उमराळे (बु), तळेगाव येथे भूकंपाचे धक्के बसल्याची प्राथमिक माहिती आहे.