क्राईमनाशिक

खळबळजनक बातमी : तलाठी परीक्षेत हायटेक कॉपी

नाशिक,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। राज्यभरातील लाखो तरुण सध्या तलाठी भरतीच्या ४ हजार ६०० पेक्षा जास्त जागांच्या निघालेल्या भरतीसाठी जिद्द आणि चिकाटीने परीक्षेचा अभ्यास करून आपलं नशिब आजमवत आहेत. असं असताना नाशिकमध्ये तलाठी परीक्षेत गैरप्रकार होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. संबंधित प्रकारामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

म्हसरुळ परिसरातील दिंडोरी रोडवरील केंद्राबाहेरून एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून वॉकीटॉकी, मोबाईल फोन, टॅब आणि हेडफोन जप्त करण्यात आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी अटक केलेला संशयित तरुण हा औरंगाबाद जिल्ह्याचा रहिवासी आहे. संशयिताच्या मोबाईलमध्ये प्रश्नपत्रिकेचे फोटोही आढळले आहेत. याप्रकरणी म्हसरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामागे एखादे रॅकेटच कार्यरत असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

महाराष्ट्रात आज वेगवेगळ्या केंद्रावर तलाठी या पदासाठी ऑनलाईन परीक्षा झाली. यानुसार नाशिकच्या म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिंडोरी रोडवरील वेब इन्फोटेक सोल्युशन, प्रा. लि. या परीक्षा केंद्रावर तलाठी पदासाठी ऑनलाईन परीक्षा झाली. या परीक्षा केंद्रावर परीक्षेसाठी आलेल्या काही उमेदवारांनी परीक्षा केंद्राबाहेरच्या परिसरात एक व्यक्ती संशयास्पदरित्या फिरत असल्याबाबत बंदोबस्तावरील पोलीस कर्मचाऱ्यांना सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिंडोरीरोडवरील शिव प्लाझा इमारतीतील ‘वेब एजी इन्फोटेक’ या केंद्रावर तलाठी भरतीसाठी गुरुवारी ऑनलाईन परीक्षा सुरू असताना संशयित गणेश शामसिंग गुसिंगे यास परीक्षा केंद्राच्या आवारात हेडफोन लावन फिरताना पोलिसांनी ताब्यात घेतले. अंगझडती घेतल्यावर त्याच्याकडे मोबाईलमध्ये प्रश्नपत्रिकेतील चित्रण केलेले प्रश्नांसह दोन मोबाईल, सिम कार्ड, हेडफोन तसेच वॉकी टॉकी अशा संशयास्पद वस्तू आढळून आल्या.

पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता गणेश गुसिंगे हा परीक्षार्थीना हायटेक पद्धतीने कॉपी पुरवीत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.या व्यक्तीकडील मोबाईल फोनमध्ये ऑनलाईन परीक्षेच्या संगणकावरील प्रश्नांचे फोटो मिळुन आले. या व्यक्तीचे साथीदारांचा शोध सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!