देवाच्या नगरीत चक्क देह व्यापार, १५ तरुणींची सुटका, मोठं रॅकेट उघड
मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। नेहमीच चर्चेत असलेल्या देवाची नगरीच्या पावित्र्याचा धक्का बसेल अशी घटना देवची नगरी म्हणजेच शिर्डी येथे सुरू असलेला चक्क देहव्यपार उघळकीस आला . पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून शिर्डी येथील तब्बल सहा बड्या हॉटेलमध्ये सुरू असलेल्या हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. हॉटेलमधून १५ पिडित मुलींची सुटका करण्यात आली असून, ११ जणांना अटक करण्यात आली आहे.
शिर्डी शहर व परिसरातील काही हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती गुप्त बातमीदारामार्फत उप अधीक्षक संदीप मिटके यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने शिर्डी येथे जावून सहा हॉटेलमध्ये छापे टाकत १५ पिडित मुलींची सुटका केली. याप्रकरणी ११ आरोपींना अटक करण्यात आली असून, आरोपींविरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात रात्री उशिराने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक संदीप मिटके, पोलीस निरिक्षक विलास पुजारी, शिवाजी डोईफोडे, मेघशाम डांगे आदींच्या पथकाने केली.