नाशिकसामाजिक

जेवण तयार करणाऱ्या केटरिंग व्यावसायिकांना अन्न व औषध प्रशासनाचा इशारा

नाशिक,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। लग्नसराई सुरू झाल्यानंतर आता या ठिकाणी केटरिंग व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी अन्यथा अन्य व औषध प्रशासन विभाग कारवाई करेल, अशा इशारा अन्न औषध विभागाचे सहआयुक्त जी. एस परळीकर यांनी केले आहे.

अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने सहआयुक्त जी.एस परळीकर यांनी म्हटले आहे की, सध्या लग्नसराई सुरू झाली आहे आणि यामध्ये केटरिंग व्यवसाय हा मोठ्या प्रमाणात सुरू असून या ठिकाणी अन्न शिजवताना आवश्यक ती काळजी घेतली गेली पाहिजे.

यामध्ये अन्न सुरक्षा मानके कायद्याअंतर्गत योग्य तो परवाना असलेल्या केटरिंग व्यावसायिकांनाच परवानगी आहे. प्रसिद्ध पत्रकात पुढे म्हटले आहे, की लग्नाचे जेवण तयार करणाऱ्या केटरिंग व्यवसाय करणाऱ्यांनी कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी केलेली असावी, त्यांना आवश्यक ते साहित्य म्हणजेच ग्लोज, डोक्याला टोपी, आधी साहित्य दिलेल्या असावे, जेवनाची भांडी ही स्वच्छ असावी, ज्या ठिकाणी अन्न शिजवले जाणार आहे, त्या ठिकाणी पूर्णपणे स्वच्छता असावी यासह वेगवेगळे नियमांचे पालन केलेले असावे.

ज्यावेळी अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी हे तपासणीसाठी येतील त्यावेळी यापैकी जर कायद्याचे पालन झालेले नसेल तर कारवाई केली जाईल, असा इशारा नाशिकच्या अन्न औषध प्रशासन विभागाचे सह आयुक्त जी.एस.परळीकर यांनी दिला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!