अवैधरीत्या गुटख्याची वाहतूक : चालकासह २४ लाखांचा गुटखा जप्त
Monday To Monday NewsNetwork।
नाशिक, प्रतिनिधी: येथील दिंडोरी परिसरातुन अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्या पिकअपसह ग्रामीण पोलिसांनी २३ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, दिंडोरी परिसरातुन अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करण्यात येत होती. काल पेठ रोड टोल नाका या रस्त्यावर एमएच १५, एचएच १०८७ या क्रमांकाचे पिकअप वाहन वाहतूक पोलिसांनी पकडून पिकअपवरील चालक मुज्लीम कपिल शेख याची विचारपूस केली असता त्याने माचीसचे पुडे असल्याचे सांगितले मात्र, याच्यावर्ती संशय आल्याने पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याची कसून चौकशी केली असता त्यामध्ये विमल पानमसाला आणि सुगंधित तंबाखू आढळून आली. याप्रकरणी पोलिसांनी २३ लाख ८० हजार रुपयांचा गुटखा यावेळी जप्त करण्यात आला असून पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा वाहतूक शाखेच पोलीस उपनिरीक्षक कैलास देशमुख व सहकारी यांनी केली. यावेळी शेख याला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे.