संतापजनक : नराधम बापाचा सहा वर्षीय पोटच्या मुलींवरच अत्याचार
नाशिक, मंडे टू मंडे न्यूज वृत्तसेवा। जन्मदात्या नराधम बापानेच, बाप – लेकीच्या नात्याला काळीमा फासला, आपल्याच सहा वर्षांच्या पोटच्या मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक बातमी नाशिकमधून समोर आली आहे. या घटनेनं नाशिक सह परिसरात मोठी खळबळ उडाली आहे
नाशिक मध्ये जन्मदात्या बापानेच आपल्या सहा वर्षांच्या मुलीवर अत्याचार केला आहे. या खळबळजनक घटनेनं खळबळ उडाली असून संताप व्यक्त केला जात आहे.
पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून आरोपी बापा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अत्याचार आणि पोस्कोअंतर्गत आरोपी वडिलांना अटक केली आहे. या घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.