भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममहाराष्ट्र

डेटिंग अँपद्वारे मैत्री करून युवतींवर अत्याचार करणाऱ्याच्या मुसक्या आवळ्या

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

नाशिक (निशाद साळवे): सोशल मिडिया तसेच डेटिंग अँपच्या माध्यमातून विवाहित महिला आणि युवतींसोबत मैत्री करत त्यांच्यासोबत प्रेमसंबंध असल्याचा बनाव करत तसेच लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला मुरबाडमधून इंदिरानगर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध यापूर्वी बलात्कार, विनयभंगाचे गुन्हे दाखल असल्याची बाब समोर आली आहे.

इंदिरानगर परिसरातून दोन महिन्यांपूर्वी एक युवती बेपत्ता झाली असल्याची तक्रार तिच्या पालकांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात केली होती. तेव्हापासून पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली तिचा शोध सुरु होता. या युवतीचा शेअर चॅट एप्लिकेशनद्वारे एका व्यक्तीशी संपर्क झाल्याचे लक्षात आले. संशयित आरोपी वैभव लक्ष्मण पाटील (रा. मुरळी, ता. पाटण, जि. सातारा) याच्यासोबत घरातून डिसेंबर महिन्यात गेल्याची माहिती समजली. इंदिरानगर पोलीस ठाण्याचे पथक सातत्याने पाटीलच्या मागावर होते. मुरबाड, ठाणे, सातारा आणि महाड या शहरांमध्ये त्याचा शोध सुरु होता.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!