नाशकात रेव्ह पार्टीवर पोलिसांची धाड; बिग बॉस फेम अभिनेत्रीसह २२ जणांना अटक
मंडे टू मंडे वृत्तसंकलंन।
नाशिक (प्रतिनिधी): इगतपुरीत रिसॉर्टमध्ये सुरु असलेल्या रेव्ह पार्टीवर पोलिसांनी धाड टाकली. छापेमारीत चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या चार महिला सापडल्या. यात बिग बॉसमध्ये सहभागी झालेल्या एका महिलेचाही समावेश आहे. नाशिक पोलिसांनी शनिवारी रात्री ही कारवाई केली.
इगतपुरी येथील मुंबई -आग्रा महामार्गावरील मानस रिसॉर्टमधील स्काय ताज व्हिलातील दोन बंगल्यात रेव्ह पार्टीचा धांगडधिंगा सुरू होता. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिक्षक सचिन पाटील यांनी आपल्या पोलीस पथकासह संबंधित ठिकाणी छापा टाकला आहे. यावेळी अनेकजण एकत्र येऊन मद्यधुंद अवस्थेत धांगडधिंगा करताना दिसले आहे. या रेव्ह पार्टीत 10 पुरुष आणि 12 महिलांचा समावेश होता. यातील काही पुरुष आणि काही महिला मादक पदार्थांचं सेवन करत बिभत्स अवस्थेत आढळून आल्या आहेत. यातील चार तरुणी या चित्रपट सृष्टीशी संबंधित असल्याची माहितीही समोर आली आहे. यातील काही महिला बॉलिवूडशी संबंधित आहे,त तर काही दक्षिणात्य चित्रपटसृष्टीशी संलग्न आहेत. शिवाय एका अभिनेत्रीनं बिग बॉस या ‘रिअॅलिटी शो’ मधील माजी स्पर्धक आहे. यामध्ये एका इराणी महिलेचा देखील समावेश आहे.
याप्रकरणी पोलिसांनी छापा टाकल्यानंतर, ट्रायपॉड, कॅमेरा आणि मादक पदार्थ जप्त केले आहेत. सर्व आरोपींना ताब्यात घेतलं असून कोरोना नियमाच्या उल्लंघनासोबत, अवैधरित्या पार्टीचं आयोजन करणे, अशा विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वेश्याव्यवसायाच्या अंगाने देखील या घटनेचा तपास केला जात आहे.