लाच घेताना पोलीस नाईक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा जाळ्यात !
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
नाशिक (निशाद साळवे): न्यायालयाच्या अजामीनपात्र वॉरंटमध्ये अटक न करण्यासाठी लाच घेणाऱ्या नाशिकरोड पोलीस ठाण्यातील पोलीस नाईकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडुन रंगेहाथ पकडण्यात आले.
याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेली अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांच्या विरुद्ध सन 2014 मध्ये नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. या गुन्ह्याचे दोषारोपपत्र प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी नाशिकरोड यांच्या न्यायालयात दाखल असून या खटल्याचे कामकाज चालू आहे. दि. 5/2/2021 रोजी तक्रारदार हे न्यायालयात गैरहजर होते. म्हणून न्यायालयाने त्यांच्या विरुद्ध अजामीनपात्र वॉरंट काढले होते. हे वॉरंट दि. 7/3/2021 त्यांनी न्यायालयातुन रद्द करून आणले. हे वॉरंट बाजावण्याचे काम पोलीस नाईक अरुण हरी लहाने यांच्याकडे आहे. त्यांनी तक्रारदार यांना अटक न करता वॉरंट रद्द करेपर्यंत वेळ दिल्याच्या मोबदल्यात 1500 रुपये लाचेची मागणी केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे वरील तक्रारीवरून सापळा रचण्यात आला. आज या लाचेची रक्कम नाशिकरोड पोलीस ठाणे आवारातील जुनी शहर पोलीसलाईन रूम नंबर 1 येथे लाच स्वीकारताना पकडण्यात आले.