इन्स्टाग्रामवर मैत्री करून अल्पवयीन मुलीवर बलात्कार : तरुणास अटक
Monday To Monday NewsNetwork|
नाशिक, निशाद साळवे : येथील सातपूर परिसरात इन्स्टाग्रामवर झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत अल्पवयीन मुलीसोबत बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित करून गर्भवती केल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी पोलिसांनी संशयित तरुणास अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सातपूरमधील सुनील गोदीराम ठाकरे (वय २७, रा. रुम क्र. १७, मातोश्री पार्क, सात माऊली मंदिराजवळ, श्रमिकनगर) या युवकाशी १७ वर्षीय पिडीत बालिकेची सोसिल नेटवर्किंग साईड वरती ओळख केली, पिडीतेशी मैत्री वाढवून संशयिताने फेब्रुवारी महिन्यात तिला घरी बोलावून घेतले; आपण दोघे आता सोबतच रहाणार आहे, असे सांगत त्याने पिडीतेच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यातून पिडीता गर्भवती राहिल्यानंतर या घटनेची वाच्यता झाली.
पिडीतेच्या तक्रारीन्वये सातपूर पोलिसांनी भादंवि कायदा कलम ३७६, बाल लैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियम २०१२ अर्थात पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सुनील ठाकरे यास मंगळवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली. उपनिरीक्षक एस. व्ही. पाटील तपास करत आहेत.