धक्कादायक; पती व मुलाला जिवे मारण्याची धमकी देत विवाहीतेवर बलात्कार
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
नाशिक (प्रतिनिधी): दिवसेंदिवस महिलांवर अत्याचाराच्या घटनान मध्ये वाढ होत असून विवाहित महिलेला पती व मुलाला ठार मारण्याची धमकी देत तिच्या घरात बळजबरीने प्रवेश करून अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार तिबेटीयन मार्केट परिसरातुन उघडकीस आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती आणि पिडीत महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, संशयित नवीन गायकवाड याने ओळखीचा गैरफायदा घेत तू माझ्याशी प्रेम संबंध ठेव नाही तर तुझी समाजात बदनामी करेल, तुझे फोटो तुझ्या पतीला पाठवेल, नाही म्हटली तर तुझा पती आणि मुलगा दोघांस ठार मारण्याची धमकी देत घरात बळजबरीने प्रवेश करून विवाहित महिलेवर बलात्कार केला.
घडलेला प्रकार पतीला सांगितला असता याचा जाब विचारण्यासाठी पती गेले असता संशयित संदेश गायकवाड व संशयितांची आईने मारहाण केली जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी पीडित महिलेंने पोलिसांत तक्रार केल्याने नवीन सुनील गायकवाडच्या विरोधात सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून नवीन गायकवाड यास अटक करण्यात आली आहे. वरिष्ठ निरीक्षक हेमंत सोमवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास सुरू आहे.