भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमनाशिक

एक कोटींची लाच घेताना महामंडळाचा सहा. अभियंता एसीबी च्या जाळ्यात

मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। कामांचे बिल काढून देण्याच्या मोबदल्यात एक कोटींची मागणी करणाऱ्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, उपविभाग अहमदनगर चे उप अभियंता किशोर गायकवाड याना एसीबीने अटक केली असून दुसरे आरोपी गणेश वाघ, तत्कालीन उपविभागीय अभियंता,सध्या नेमणूक कार्यकारी अभियंता, धुळे, जिल्हा धुळे हे फरार असल्याची माहिती मिळत आहे.

अधिक माहिती अशी की, यातील तक्रारदार यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, अहमदनगरच्या औद्योगिक वसाहती मध्ये 1000 एमएम व्यासाची लोखंडी पाईपलाईन बदलण्याचे कामाचे मंजूर निविदेनुसार 31,57,11,995/- रुपयाचे रकमेचे 5 टक्के प्रमाणे अनामत रक्कम 1,57,85,995/- रुपये तसेच सदर कामाचे सुरुवातीची सुरक्षा ठेव रक्कम 94,71,500/- रुपये झालेल्या कामाचे अंतिम देयक 14,41,749/- रुपये असे एकूण 2,66,99,244/- रुपये तक्रारदार यांना मिळावे म्हणुन सदर बिलावर गणेश वाघ यांचा मागील तारखेचे आऊट वर्ड करून त्यावर वाघ यांच्या सह्या घेऊन सदर देयक त्यांच्याकडे पाठविण्याचा मोबदल्यात अमित गायकवाड यांनी स्वतः साठी तसेच गणेश वाघ यांचेकरीता तक्रारदार यांचे सदर कामाचे बिलाचे व यापूर्वी अदा केलेली काही बिलांची बक्षीस म्हणून 1,00,00,000/- (एक कोटी) रुपये लाचेची मागणी करून लाच स्विकारली म्हणुन किशोर गायकवाड वय- 32 वर्ष, सहाय्यक अभियंता, वर्ग 2, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, उपविभाग अहमदनगर, जिल्हा- अहमदनगर
व गणेश वाघ, वर्ग 1 तत्कालीन उपविभागीय अभियंता, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, उपविभाग अहमदनगर, जिल्हा- अहमदनगर सध्या नेमणूक कार्यकारी अभियंता, धुळे, जिल्हा- धुळे यांचेवर दि,३ नोव्हेंबर शुक्रवार रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरची कारवाई, सापळा अधिकारी स्वप्निल राजपूत , पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक, पो.ना.प्रभाकर गवळी,पो. ना. संदीप हांडगे,पो. ना. किरण धुळे ,पो.ना.सुरेश चव्हाण नाशिक यांनी केली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!