भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमनाशिक

सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक १५ हजाराची लाच घेताना एसीबी च्या जाळ्यात

मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l वाईन शॉप (देशिविदेशी दारू दुकान) चा परवाना रद्द न करण्यासाठी व दुकानावरील ग्राहकांवर कारवाई न करण्यासाठी वीस हजाराची लाच मागितली शेवटी तडजोडी अंती रुपये १५ हजाराची लाच घेताना राहुरी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उप निरीक्षक ज्ञानदेव नारायण गर्जे, स. पो. उपनि राहुरी पोलिस स्टेशन, अहमदनगर. (राहणार – भाग्योदय रो हाउस तपोवन रोड, राजबिर हॉटेल समोर मुक बधीर विद्यालय जवळ अहमदनगर.) यांना अहमदनगर एसीबी ने अटक केली.

यातील ५० वर्षीय तक्रारदार हे आय.एम. मोटवानी वाइन शॉप राहुरी, अहमदनगर येथे व्यवस्थापक म्हणून नोकरीस आहे. ते लिकरचां सप्लाय करतात. तक्रारदार यांच्या आय. एम. मोटवानी वाइन शॉपमध्ये नगर जिल्ह्यातून येणाऱ्या लिकर खरेदी करणाऱ्या ग्राहकांवर व तक्रारदार यांच्यावर कारवाई करून तक्रारदार यांना गुन्ह्यात आरोपी करून दुकानाचे परवाना रद्द करण्याची धमकी देऊन तक्रारदार व त्याच्या ग्राहकांवर कारवाई न करण्यासाठी दरमहा २०,००० रुपयाची मागणी करून तडजोडी अंती १५,००० रू लाचेची रक्कम पंचा समक्ष स्वीकारली. सदर रक्कम स्वीकारताना लोकसेवक सहा.पो. उप.निरि. ज्ञानदेव नारायण गर्जे यांना रंगेहाथ पकडण्यात येऊन ज्ञानदेव नारायण गर्जे यांना अटक करण्यात येऊन त्यांचे विरुद्ध राहुरी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची घटना दि ५ मार्च २०२४ मंगळवार रोजी घडली.

सापळा व तपास अधिकारी
निलिमा केशव डोळस, पोलीस निरीक्षक ला..प्र.वि. नाशिक, पोलिस नाईक संदीप हांडगे. पोलिस शिपाई सुरेश चव्हाण यांच्या पथकाने यशस्वी केला.

*=

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!