भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमनाशिक

प्रसूतीसाठी आलेल्या गर्भवतीस मारहाण करणारी सफाई कामगार महिला निलंबित

नाशिक, प्रतिनिधी : जिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झालेल्या गर्भवती महिलेस महिला सफाई कर्मचाऱ्याने मारहाण केल्याचे सिद्ध झाल्यावर त्रिसदस्यीय समितीने केलेल्या चौकशीत चतुर्थ श्रेणी कर्मचारी महिला दोषी आढळली आहे. तिच्यावर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी निलंबनाची कारवाई केली असून, चतुर्थ श्रेणी वर्गात संतापाची लाट पसरली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी, पेठ तालुक्यातील रहिवासी हिरा कैलास गारे यांना मंगळवारी (दि. ९) रात्री प्रसूती कळा आल्याने कुटुंबीयांनी त्यांना पेठ येथील रुग्णालयातून जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. दरम्यान, हिरा यांच्या आरोपानुसार पहाटे चारच्या सुमारास कळा असह्य झाल्याने त्या वॉर्डातील बाथरुमच्या दिशेने जात असताना सफाई कर्मचाऱ्याने त्यांना अडविले. कर्मचाऱ्याने शिवीगाळ करीत हिरा यांना भिंतीवर ढकलले, तसेच ‘तुझ्यावर केस करून तुरुंगात पाठवेन आणि तेथेच प्रसूती केली जाईल,’ असे म्हणत हिरा यांना मारहाण केली.

पीडित महिलेला या घटनेत भिंतीवर ढकलून दिल्याने खाली पडून तिच्या पोटाला मार लागला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी प्रसूतीच्या वेळी मुख्य डॉक्टरही उपस्थित नसल्याचा आरोप त्यांनी केला होता. हलगर्जीपणामुळे बाळाच्या डोक्याला मार लागला. त्यामुळे त्यास एसएनसीयू विभागात ठेवण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात प्रसूतीच्या वेळी मुख्य डॉक्टरही हजर नसल्याने बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप पीडितेने व नातलगांनी केला होता. या पार्श्वभूमीवर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी घटनेतील तथ्य शोधण्यासाठी अतिरिक्त शल्यचिकित्सकांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती नेमली होती. यात महिला सफाई कामगार महिलेस निलंबित करण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!