नाशिक मध्ये दहा दिवसाचा लॉकडाऊन,वैद्यकीय सेवा वगळता सर्व दुकानं बंद
Monday To Monday NewsNetwork।
नाशिक (निषाद साळवे)।नाशिकमध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे नाशिकमध्ये 10 दिवसांच्या लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. वैद्यकीय सेवा वगळता सर्व भाजीपाला आणि किराणा दुकानं बंद राहणार आहे.नाशिकमध्ये पुढील 10 दिवस कडक लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे.12 ते 22 मेपर्यंत लॉकडाऊन असणार आहे. नाशिक मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी याबद्दल माहिती दिली आहे. वैद्यकीय सेवा वगळता सर्व दुकानं बंद राहणार आहे. औद्योगिक वसाहती देखील केवळ इन हाऊस सुरू राहणार आहे.
तर, जीवनावश्यक वस्तूमध्ये भाजीपाला,दूध,किराणा दुकाने देखील बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. फक्त मेडिकल कारण वगळता इतर कोणतेही कारणा शिवाय बाहेर पडण्यास बंदी घालण्यात आली आहे. पेट्रोल आणि डिझेल पंपावर देखील केवळ अत्यावश्यक वाहनांना इंधन मिळणार आहे.भाजीपाला आणि किराणा दुकानं 10 दिवस बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे भाजीपाला आणि किराणा घेण्यासाठी नाशिकरांना 2 दिवसांची मुभा देण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्याबाहेर किंवा जिल्ह्यात अत्यावश्यक कामासाठी प्रवास करणाऱ्यांना पास बंधनकारक असणार आहे.